ECB नं बेन स्टोक्सला धडा शिकवला, नाईट क्लब वादानंतर कर्णधारपद गेलं, संघातून बाहेर काढलं
लंडन : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं म्हणजेच ईसीबीनं बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन यांच्या नाईटक्लबमधील राड्याची चौकशी सुरु असल्यानं मोठा निर्णय घेतला आहे. बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन या दोघांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आलं आहे. ईसीबीनं दुसऱ्या कसोटीसाठी 15 जणांचा संघ जाहीर केल्यानंतर बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन यांना संघाबाहेर ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. बेन स्टोक्सला संघाबाहेर काढल्यानंतर जो रुट याला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी प्रभारी कर्णधार करण्यात आलं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी 17 जून ते 21 जून दरम्यान द ओवलमध्ये खेळवली जाणार आहे.
ईसीबीनं या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं नाईट क्लब वादाची चौकशी लक्षात घेता बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन यांच्या नावाचा विचार दुसऱ्या कसोटीसाठी करण्यात आलेला नाही. ही कसोटी 17 जूनला द ओवलमध्ये सुरु होणार आहे. बेन स्टोक्स संघाबाहेर असल्यानं जो रुट संघाचा कर्णधार असेल. तर, जोफ्रा आर्चर आणि जॉर्डन कॉक्स या दोघांना देखील संघात स्थान मिळालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन नाईट क्लबमध्ये झालेल्या वादात सहभागी होते. त्यांचा एका रग्बी खेळाडू आणि त्याच्या सहकाऱ्यासोबत वाद झालेला. इंग्लंडनं न्यूझीलंड वर पहिल्या कसोटीत 115 धावांनी विजय मिळवल्यानंतर ही घटना घडली होती. ती कसोटी लॉर्डसवर झाली होती.
दरम्यान काही रिपोर्टनुसार बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन यांचा नाईटक्लबमध्ये झालेल्या वादात सहभाग होता. टॉक स्पोर्टसनं मंगळवारी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की स्टोक्स कर्णधारपद सोडू शकतो किंवा निवृत्तीची घोषणा करु शकतो.
न्यूझीलंड विरुद्धची पहिली कसोटी संपल्यानंतर खेळाडूंकडून प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याप्रकरणी चौकशी केली जात असल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डानं म्हटलं होतं.
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.