इक्नॉलॉजी मानवांची जागा घेऊ शकत नाही.

सीडीएस अनिल चौहान यांचे वक्तव्य : तंत्रज्ञान करू शकते मदत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तंत्रज्ञान संबंधितांना सक्षम करू शकते, परंतु ते लोकांचे स्थान घेऊ शकत नाही असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी बुधवारी म्हटले आहे. देश सध्या अनेक धोक्यांचा सामना करत आहे आणि देशात उप-पारंपारिक प्रकारचा संघर्ष दिसून येत आहे. पाश्चिमात्यांच्या जागतिक युद्ध किंवा दहशतवाद यासारख्या संज्ञांपूर्वीच भारताने ‘अपारंपरिक प्रकारच्या संघर्षा’सारखी संज्ञा मांडली होती असे सीडीएस चौहान यांनी रायसीना डायलॉगमध्ये एका चर्चासत्रादरम्यान म्हटले आहे.

भारताला अंतर्गत आणि बाहेरून दोन्ही ठिकाणी आव्हाने मिळत आहेत. जमिनीवर सैनिकांच्या उपस्थितीला कुठलाच पर्याय नसल्याचे मला वाटते. तंत्रज्ञान मदत करू शकते, परंतु ते लोकांचे स्थान घेऊ शकत नाही आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हणत सीडीएस चौहान यांनी युद्धाची तयारी मजबूत करणे आणि गुप्तचर विभागाला मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.

जगात वेगाने बदल घडून येत आहेत. पूर्वी पारंपरिक युद्ध व्हायचे, परंतु आता काळ बदलला आहे अन् संघर्ष अजूनही जारी आहे. सैन्याला पारंपरिक युद्धासाठी तयार करण्यासोबत जे हायब्रिड युद्ध लढले जातेय, त्यासाठी तयार करणे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे उद्गार चौहान यांनी काढले आहेत.

अफवांना रोखण्याचे आव्हान

एक बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक आणि बहुजातीय समाजात अफवांना रोखणे देखील एक मोठे आव्हान आहे. आम्हाला याला बौद्धिक लढाई म्हणतो. ज्या वेगाने तंत्रज्ञानात बदल होत आहेत, त्या वेगाने त्याला स्वत:च्या व्यवस्थेत अंगिकारणे आणि लोकांना प्रशिक्षित करणे देखील मोठे आव्हान असल्याचे चौहान म्हणाले.

प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे

सातत्याने देखरेख ठेवून संघर्ष टाळले जाऊ शकतात असे म्हणत अमेरिकन कंपनी जनरल एटोमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे सीईओ विवेक लाल यांनी सहकारी देशांदरम्यान डाटा पुरविणे आणि मनुष्यबळाला प्रशिक्षित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अत्यंत मजबूत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.