महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर, मतदान 12 मे रोजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेतील आमदारांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार असल्यामुळे ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

या निवडणुकीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये संजय किशनराव केनेकर, नीलम दिवाकर गोऱ्हे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, संदीप दिवाकर जोशी, दादाराव यादवराव केचे, अमोल रामकृष्ण मिटकरी, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, राजेश धोंडीराम राठोड आणि शशिकांत जयवंतराव शिंदे यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या निवडणुकीची अधिसूचना 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 असून अर्जांची छाननी 2 मे रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 मे निश्चित करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मतदान 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 13 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Comments are closed.