जर काही चुकीचं झालं असेल तर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं, राहुल गांधींच्या आरोपांवर अजित पवार यांचे विधान
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतं चोरली असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याचे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर केले होते. त्यावर काही चुकीचे झाले असेल तर निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार म्हणाले की, बारामतीचे उदाहरण घ्या. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात आमच्या उमेदावाराला 48 हजार मतं कमी पडली. पाच महिन्यांनंतर मी विधानसभा निवडणुकीला उभा होतो. त्याच मतदारांनी मला मोठ्या मताधिक्यांनी निवडून दिलं. मी काही चुकीचं केलं का? असं नसतं. मी आधीही म्हणालो होतो की आपल्या संविधानानुसार कुठल्याही व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तो प्रश्न चुकीचा असो वा बरोबर निवडणूक आयोगाने उत्तर देणे अपेक्षित आहे. जर काही चुकीचं आढळलं तर त्यावर आयोगाने कारवाई करणे अपेक्षित आहे असेही अजित पवार म्हणाले.
#वॉच | मुंबई: महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात लोकसभा लोप आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरोपावर उपमुख्यमापनाचे मुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “बरामतीचे उदाहरण पहा. बरामातीमधील लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला 48,000 कमी मते मिळाली. pic.twitter.com/36r8fhvzqh
– वर्षे (@अनी) 12 ऑगस्ट, 2025
Comments are closed.