क्रिकेटविश्वात खळबळ! ED ने जप्त केली युवराज अन् उथप्पाची कोट्यवधींची मालमत्ता, नेमकं काय घडलं?

ईडीने युवराज सिंग-रॉबिन उथप्पा यांची संपत्ती जप्त केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांची नावे ऑनलाइन बॅटिंग प्रकरणात समोर आल्यानंतर आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

ईडीची मोठी कारवाई, कोट्यवधींची संपत्ती जप्त

ईडीने 1xBet शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांची संपत्ती जप्त केली आहे. युवराज सिंगची 2.5 कोटी रुपये किमतीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तर रॉबिन उथप्पा यांची 8.26 कोटी रुपये किमतीची संपत्ती अटॅच करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीने याआधीही दोघांची चौकशी केली होती. आजच्या कारवाईत एकूण 7.93 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असून ही कारवाई दोन्ही माजी क्रिकेटपटूंकरिता मोठा धक्का मानली जात आहे.

याआधीही अनेक क्रिकेटपटूंवर कारवाई

या 1xBet प्रकरणात याआधी ईडीने याआधी शिखर धवन यांची 4.55 कोटी रुपये, तर सुरेश रैना यांची 6.64 कोटी रुपये किमतीची संपत्ती जप्त केली होती. आतापर्यंत ईडीने या प्रकरणात एकूण 19.07 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरूच आहे.

सुमारे 1000 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा संशय

ईडीच्या माहितीनुसार, हे प्रकरण सुमारे 1000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे. ऑनलाइन सट्टेबाजी वेबसाइट 1xBet विरोधात PMLA अंतर्गत तपास सुरू आहे. मागील महिन्यातच ईडीने या प्रकरणाबाबत माहिती देत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

7 सेलिब्रिटींची मालमत्ता तात्पुरती जप्त

शुक्रवारी ईडीने मोठी कारवाई करत या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, रॉबिन उथप्पा तसेच 7 सेलिब्रिटींची मालमत्ता तात्पुरती जप्त (अटॅच) केली आहे. युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्यासह बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला, नेहा शर्मा, अभिनेता सोनू सूद, बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि अभिनेता अंकुश हाजरा यांची चल व अचल मालमत्ता या कारवाईत अटॅच करण्यात आली आहे. या सर्व मालमत्तेची एकूण किंमत सुमारे 7.93 कोटी रुपये इतकी असल्याचा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत करण्यात आली आहे.

हे ही वाचा –

Rohit Sharma : ‘हिटमॅन’ OUT! मुंबई संघात रोहित शर्माचं नाव नाही, चाहते हादरले… सूर्या अन् शिवम दुबेचाही पत्ता कट, अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय

आणखी वाचा

Comments are closed.