मोठी बातमी : ED चा सुरेश रैना, शिखर धवनला मोठा धक्का, 11.14 कोटीची संपत्ती जप्त
नवी दिल्ली : ईडीने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग साइटशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.
सट्टेबाजीशी संबंधित मनी-लाँडरिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली: अधिकारी. pic.twitter.com/LJSMZUlk4e
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 6 नोव्हेंबर 2025
गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक आदेशानुसार, प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग कायदा (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यात शिखर धवन यांची 4.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि सुरेश रैना यांच्या 6.64 कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंडची जप्ती करण्यात आली आहे. ईडीच्या तपासात असे आढळले आहे की दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी “जाणूनबुजून” परदेशी कंपन्यांशी करार करून 1xBet आणि त्याच्याशी संबंधित अन्य साइट्सच्या जाहिराती केल्या होत्या.
आणखी वाचा
Comments are closed.