निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
जळगाव : शहरातील राजमल लखीचंद ग्रुपने स्टेट बँकेची (SBI) कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची सीबीआयकडे तक्रार करणाऱ्या स्टेट बँकेनेच आता आर.एल.ग्रुपने फसवणूक केली नसल्याचं लेखी पत्रच आर.एल.ग्रुपला दिल्याची माहिती आर.एल. ग्रुपचे संचालक आणि माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जळगावमधील सोन्याच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या राजमल लाखीचंद ज्वेलर्स या फर्मने स्टेट बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआय आयकडे तक्रार केल्याच्यानंतर, सीबीआय आणि ईडीने (ED) या सोन्याच्या पिढीवर छापेमारी करीत कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता सील केल्याचं पाहायला मिळाले होते. विशेष म्हणजे या छापेमारीच्या घटना निवडणुकांच्या काही महिने अगोदर घडल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली होती. मात्र, राजमल लखीचंद ज्वेलर्स या फर्मने आपली फसवणूक केली नसल्याचं पत्रच आता स्टेट बँकेने दिलं आहे. राजमल लखी चंद ज्वेलर्स या फर्मला तसे पत्र स्टेट बँकेने पाठवले असल्याचा दावा या फर्मचे संचालक माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
स्टेट बँकेच्या या भूमिकेने आपल्याला मोठा दिलासा मिळाला असून आपल्या आयुष्यात हा दिवाळीसारखा आनंद असल्याचं ही जैन यांनी म्हटलं आहे. व्यावसायिक कामासाठी राजमल लखीचंद ज्वेलर्स या फर्मने कोट्यवधी रुपयांचे कर्ज स्टेट बँके कडून घेतले होते. मात्र, हे कर्जफेड करताना स्टेट बँक आणि आर.एल. ज्वेलर्स या फर्ममध्ये वाद निर्माण झाले होते. या वादाचे रूपांतर सीबीआय आणि ईडी कारवाईमध्ये झाले, स्टेट बँकेने केलेल्या तक्रारीमुळे आर.एल.ज्वेलर्स या फर्मची प्रतिमा जनसामान्यांमध्ये मलिन झाली होती. मात्र, आपल्यावर झालेली कारवाई ही अन्यायकारक असल्याचा दावा आर एल ग्रुपचे ईश्वरलाल जैन यांनी केला होता. त्यानंतर, या कारवाईविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता, ज्या स्टेट बँकेने आरएल ग्रुपवर फसवणूक केल्याची तक्रार केली होती, त्याच स्टेट बँकेने आता, आपली फसवणूक झाली नसल्याच पत्रच आर.एल ग्रुपला दिल्याचं ईश्वर जैन यांनी सांगितलं. या पत्राच्या मुळे आपल्यावर या पूर्वी झालेल्या सीबीआय आणि ईडी कारवायामधून ही न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला दिलासा मिळणार असल्याचा विश्वासही जैन यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे. दरम्यान, स्टेट बँकेच्या या पत्राने आपल्या दिलासा मिळाला असला तरी हे प्रकरण अजूनही न्याय प्रविष्ट असल्याने आपण या विषयात अधिक बोलू इच्छित नसल्याचं जैन यांनी म्हटल आहे.
हेही वाचा
<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai/mumbaikars-follow-the-gililliss- to-avoid-heatstroke- आणि-muniptal-corporition- अॅडव्हिस-फॉर-समर-टू-टू-डू-टू-डू-डू -1348542">मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
Comments are closed.