क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे – दिलीप वेंगसरकर
क्रिकेट बरोबरच शिक्षणही तेवढेच महत्वाचे आहे. सध्या शालेय परीक्षांचा कालावधी सुरू आहे, त्यामुळे काही काळ क्रिकेटला थोडा विराम देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होण्यावर लक्ष केंद्रित करा. शेवटी आयुष्यात क्रिकेट खेळण्याचा कालावधी हा फार छोटा असतो आणि शिक्षणात तुम्ही योग्य ती प्रगती साधलीत तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही”, असे हिंदुस्थानचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले. 15 वर्षाखालील मुलांच्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेच्या ओव्हल मैदान येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. साईश क्रिकेट अकादमी संघाने पटेल क्रिकेट कोचिंग सेन्टर वर दोन विकेट्सनी विजय मिळवून या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
Comments are closed.