ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या आठ भारतीयांना श्रीलंकेत अटक
कोलंबो: बेकायदेशीर ऑनलाइन जुगार खेळल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेत आठ भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
22 ते 51 वयोगटातील संशयितांना कोलंबो उपनगरातील थलंगामा पोलिसांनी रविवारी थलावाथुगोडा येथील एका घरात अवैध जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून अटक केली.
छापेमारीत संगणक आणि मोबाईल जप्त करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.