दिल्लीत भिंती कोसळण्यात आठ जण ठार झाले
मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी दुपारी दिल्लीतील जैतपूर पोलीस स्टेशन परिसरात एका घराच्या भिंतीखाली गाडल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 3 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलींचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात अनेक जण जखमी झाले असून मदत व बचावकार्य सुरू आहे.दिल्लीत दोन दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. याचदरम्यान जैतपूर एक्स्टेंशन परिसरात अचानक घराची एक जुनी भिंत कोसळल्यामुळे अनेक लोक गाडले गेले. बचावकार्यादरम्यान आठ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. हे सर्व स्थानिक रहिवासी होते.
दुसरीकडे, दिल्लीत 100 हून अधिक विमाने उशिरा उ•ाण करत आहेत. अनेक भागात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने शनिवारी संपूर्ण दिवसासाठी रेड वेदर अलर्ट जारी केला होता. शहरात शनिवारी सकाळी झालेल्या पावसामुळे पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली. अनेक भागात लांब वाहतूक कोंडी झाल्याच्या वृत्तांमुळे शहर ठप्प झाले. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले आहे.
Comments are closed.