तुम्हाला मुलगा नाही, त्यामुळे मुलगा गेल्याचं दु:ख कळणार नाही, खडसेंचा महाजनांवर हल्ला
Eknath Khadse on Girish Mahajan : भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामधील आरोप प्रत्यारोप काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांच्याच संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे असे खडसे म्हणाले. एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाच्याकडे एवढी संपत्ती कशी? असा सवाल महाजन यांनी केलाय. माझा मुलगा गेला, त्याचं मला दुःख आहे. पण महाजन यांना मुलगा नसल्याने ते दुःख यांना कळणार नसल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे.
एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी?
गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरुन माझ्या संपत्तीची आतापर्यंत पाच वेळा चौकशी करण्यात आली आहे. माझ्या काय चौकशा करायच्या त्या करा, पण मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करून दाखवावी असे एकनाथ खडसे म्हणाले. तसेच एका सेवा निवृत्त शिक्षकाच्या मुलाकडे एवढी संपत्ती कशी? सा सवाल देखील महाजन यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा व्यवसाय आहे तरी काय? असा सवालही खडसेंनी केला.
हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाकडे काही महत्वाचे पुरावे आणि माहिती
आपल्या मुलाच्या आत्महत्येबाबत काय चौकशी करायची ते करु शकतात. माझा मुलगा गेला, त्याचं मला दुःख आहे. महाजन यांना मुलगा नसल्याने ते यांना कळणार नसल्याचंही एकनाथ खडसे यांनी म्हटल आहे. हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाकडे काही महत्वाचे माहिती पुरावे आहेत. ते त्याच्याकडून हस्तगत करता यावे किंवा ते इतरांना मिळू नये यासाठी त्याला विविध गुन्ह्यात ताब्यात घेऊन अडकवण्यात येत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला आहे.
महायुतीचे मंत्री गिरीश महाजन आणि एकेकाळी भाजपात असलेलेल पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे यांच्यातील वैर जगजाहीर आहे. थोडीशी जरी संधी मिळाली तरी खडसे आणि गिरीश महाजन एकमेकांना डिवचायला सुरुवात करतात. आज महाजन यांनी खडसेंवर पुन्हा निशाणा साधला होता. मला खडसेंचा राग येत नाही पण त्यांची कीव येते असं म्हणत महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
खडसेंचं वय झालं पणं सोय आली नाही, मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल
आणखी वाचा
Comments are closed.