एक बटण दाबलं की देशात हाहाकार माजेल; हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंची उडी

नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी उडी घेतली आहे. एक बटन दाबले तर हाहाकार माजेल, असा इशारा खडसे यांनी दिला आहे.

नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात 72 वरिष्ठ अधिकारी आणि काही नेते हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा सुरू असताना विधानसभेत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक पेन ड्राइव्ह दाखवला आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी खळबजनक आरोप केलाय. प्रफुल्ल लोढानं एक व्हिडीओ बनवला होता. त्यात अनेक तथ्य असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. एक बटण दाबलं की संपूर्ण देशात हाहाकार माजेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. इतकंच नाहीतर प्रफुल्ल लोढाकडे सगळे व्हिडीओ आहेत. त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली.

प्रफुल्ल लोढा भाजपमध्ये असून तो गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय मानले जातात. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असून तो गिरीश महाजनांचा कार्यकर्ता आहे, असे सांगत असताना प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटकही करण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

Comments are closed.