Eknath Shinde again absent from the meeting called by the CM Devendra Fadnavis


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली. ज्यामुळे याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर शिंदेंचे गैरहजर राहण्याचे नेमके कारण काय? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात सध्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेल्या महायुतीचे सरकार आहे. पण या महायुतीच्या सरकारमध्ये सतत नाराजीचा सूर पाहायला मिळतो. कधी आमदार नाराज, तर कधी थेट उपमुख्यमंत्री शिंदे नाराज होतात. पण सर्वाधिक नाराजी ही शिंदे गटाचीच असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला दांडी मारली. ज्यामुळे याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर शिंदेंचे गैरहजर राहण्याचे नेमके कारण काय? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (मराठी again absent from the meeting called by the CM Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 12 फेब्रुवारी) पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांच्या विकास प्राधिकरणाची बैठक बोलावली होती. सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 01.00 वाजता झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणे महत्त्वाचे होते. परंतु, त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. पण शिंदे हे काही पहिल्यांदाच अशा बैठकीला गैरहजर राहिलेले नसून ते याआधी एक मंत्रिमंडळ बैठक तसेच 100 दिवसांच्या आढावाच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. पण आता पुन्हा या बैठकीला त्यांनी दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा… मराठी : आतापर्यंत वंदनीय असणाऱ्या शरद पवारांवरच राऊतांची टीका, एकनाथ शिंदेचा टोला

बुधवारी झालेल्या बैठका या नगरविकास खात्याशी संबंधित असल्याने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या खात्याचे मंत्री असल्याने त्यांनी या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे होते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे एकनाथ शिंदेंना बैठकीचा निरोप मंगळवारी दुपारी देण्यात आला होता. परंतु आपले पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकांना अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे. या बैठकांना न जाता शिंदे मलंगगड उत्सवास उपस्थित राहिले होते. त्यामुळे याबाबत सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.



Source link

Comments are closed.