एकनाथ शिंदे मध्यरात्री वर्षा बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा, एसपी तुषार द

सातारा झेडपी निवडणूक राडा भाजप आणि शिंदे कॅम्प : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी पोलिसांकडून शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन सोमवारी विधिमंडळातील वातावरण प्रचंड तापले होते. शिंदे सेनेच्या आमदारांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांच्यासह 100 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी तुषारी दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. यावरुन काल भाजप आणि शिंदे सेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर सोमवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाली. (Maharashtra Politics News)

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात शिवसेनेकडून खेळण्यात आलेली राजकीय खेळी आणि शंभुराज देसाई यांच्या आरोपांबाबत नाराजी बोलून दाखवली.  तसेच सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावरूनही मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केल्याचे समजते. मोठा भाऊ म्हणून भाजपची भूमिका सामंजस्याची आहे. पण साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी फडणवीसांना स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेतील वाद निवळणार की त्याला वेगळं वळण लागणार, हे आता पाहावे लागेल.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. तो आदेश राखून ठेवल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली होती. त्यामुळे सभापतींच्या आसनावरुन देण्यात आलेल्या निर्देशाची अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना आमदारांनी सोमवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून तुषार दोशी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचवेळी साताऱ्यात भाजपचे आमदार जयकुमार गोरे वागले ते योग्य होते का, असा प्रतिसवालही एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला होता. त्यामुळे काल वर्षा बंगल्यावर झालेल्या चर्चेनंतर शिवसेना-भाजप वादावर पडदा पडणार का, हे पाहावे लागेल. त्यामुळे आज विधान भवनात काय घडणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Shivsena Shinde Camp: शिवसेनेच्या आमदारांकडून राजीनामा अस्त्राची धमकी

शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची गळचेपी सुरु आहे. असाच प्रकार सुरु राहिला तर आम्हाला राजीनामे द्यावे लागतील. साताऱ्यात भाजपने रडीचा डाव खेळला. संख्याबळ नसताना अध्यक्षपद हिसकावून घेतले. पोलिसांनी भाजपला कार्यकर्त्यासारखी मदत केली, अशा शब्दांत शंभुराज देसाई यांनी आपल्या मनातील खदखद एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली. एकनाथ शिंदे यांनीही सातारा पोलिसांच्या कृत्याबाबत विधिमंडळात तीव्र नाराजी बोलून दाखवली. मी साताऱ्यातील मतदानापूर्वी तुषार दोशी यांना फोन केला होता. कोणालाही मतदानापासून वंचित ठेऊ नये, त्यानंतर कारवाई करावी, असे सांगितले होते. तेव्हा तुषार दोशी यांनी तसे काही घडणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात मतदानाला गेल्यावर जिल्हा परिषद सदस्यांना रोखण्यात आले. पालकमंत्री, मंत्री व आमदारांना पोलिसांनी आरोपींप्रमाणे फरफटत नेले, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

आणखी वाचा

फडणवीसांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यांवरच्या आंदोलनाबाबत नाराजी बोलून दाखवली, एकनाथ शिंदेंचा तात्काळ प्रतिसवाल, म्हणाले, ‘साताऱ्यात जयकुमार गोरे वागले ते योग्य होतं का?’

आणखी वाचा

Comments are closed.