प्रकाश सुर्वेंनी रात्री उशीरापर्यंत तळ ठोकला, भाजपाचा हट्ट अन् शेवटी तेच झालं; एकनाथ शिंदेंच्या

मराठी BMC Election 2026: मुंबईत जागावाटपांचा तिढा अखेर (BMC Election 2026) सुटला. मुंबईत भाजपाच मोठा भाऊ असणार आहे. मुंबईत भाजपा 137, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे. तर आरपीआयला शिवसेना त्यांच्या 90 जागांमधून जागा देणार आहे. शिवसेना भाजपाचं मुंबईत एकत्र लढण्यावर पहिल्यापासून एकमत होतं. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. जागावाटपासाठी समन्वय समितीकडून बैठकांचं सत्र सातत्याने सुरू होतं. अखेर अर्ज भरायला एक दिवस बाकी असताना रात्री उशिरा तिढा सुटला. शिवसेनेकडून रात्रीतच एबी फॉर्म वाटायला सुरूवात झाली. मुंबईत शिवसेना शिंदे गट आणि भाजपा युतीवर शिक्कामोर्तब झालं असलं तरी काल झालेल्या समन्वय समिती बैठकीत काही जागांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरूच होती अशी माहिती समोर आली आहे. (मराठी-Devendra Fadnavis)

पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमाक 5 साठी भाजपा आणि शिवसेनेत (Shivsena Shinde Group-BJP Yuti) अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. 5 तास या एका जागेसाठी खल सुरू होता. ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेते आणलेल्या संजना घाडी यांना ही जागा हवी होती. अखेर ही जागा भाजपाच्या पदरात पडली. शिवसेनेला वॉर्ड क्रमांक 4 ची जागा देण्यात आली. मात्र त्या जागेसाठी त्या फारशा उत्साही नाहीत. वॉर्ड क्रमांक 4 साठी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते. आता वॉर्ड क्रमांक 4 साठी रस्सीखेच सुरू झालीय. मुलासाठी ही जागा न सुटल्याने आमदार सुर्वे रात्री उशिरापर्यंत नंदनवन बंगल्यावर तळ ठोकून होते.

भाजपाच्या हट्टापुढे शिंदेंच्या शिवसेनेचं काहीही चाललं नाही, नेमकं काय घडलं? (BMC Election 2026)

पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमांक 5 साठी भाजपा आणि शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती. 5 तास या एका जागेवरून भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते नंदनवन बंगल्यावर चिंतन करत होते. कारण वॉर्ड क्रमांक 5 ची जागा भाजपाला आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधु प्रकाश दरेकर यांना हवी होती. मात्र वॉर्ड क्रमांक 5 च्या माजी नगरसेविका संजना घाडी या नुकत्याच उबाठाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आल्या होत्या. पक्षात येतानाच त्यांना उमेदवारीची हमी देण्यात आली होती, मात्र भाजपाच्या हट्टापुढे शिंदेंच्या शिवसेनेचं काहीही चाललं नाही. आता संजना घाडी यांना वॉर्ड क्रमांक 5 च्या बदल्यात वॉर्ड क्रमांक 4 ची जागा दिली जात आहे. मात्र त्या या जागेसाठी तितक्याशा उत्साही नाहीत. मात्र दुसरीकडे याच वॉर्ड क्रमांक 4 च्या जागेसाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते. आता वॉर्ड क्रमांक 4 ची जागेसाठी शिवसेनेतच रस्सी खेच पहायला मिळत आहे. संजना घाडी जरी या वॉर्डासाठी नाराज असल्या तरी दुसरा पर्याय नाही. मात्र मुलासाठी जागा सुटत नसल्याने शिवसेना आमदर प्रकाश सुर्वे रात्री उशिरपर्यंत नंदनवन बंगल्यावर तळ ठोकून होते.

संबंधित बातमी:

All Party Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपा, मनसे, ठाकरे-शिंदे गट, काँग्रेसपर्यंत; सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!

आणखी वाचा

Comments are closed.