Eknath Shinde criticizes Sanjay Raut for opposing the Waqf Amendment Bill


वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबध नाही. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वक्फ सुधारणा विधेयकला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पूर्ण पाठिंबा नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज (02 एप्रिल) संयुक्त संसदीय समितीने प्रस्तावित केलेले वक्फ सुधारणा विधेयक 2025 लोकसभेत चर्चा आणि मंजूरीसाठी सादर केले. मात्र त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबध नाही. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. वक्फ सुधारणा विधेयकला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पूर्ण पाठिंबा नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (मराठी criticizes Sanjay Raut for opposing the Waqf Amendment Bill)

वक्फ बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही, असे ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले की, वक्फ बोर्डाबाबत शिवसेनेची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आम्ही अशा गोष्टींमध्ये सोयीच राजकारण कधी करत नाही. सोयीचं राजकारण करणारे लोकं याचा हिंदुत्वाशी संबंध नाही, असे जेव्हा म्हणतात, तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते. बाळासाहेबांचे आणि आनंद दिघे यांचे जे विचार आहेत, त्या माध्यमातून आम्ही जो निर्णय घेतो, तो खुलेआम घेतो. असं होईल, तसं होईल आणि याचा त्याच्याशी संबंध नाही, अशी दुटप्पी भूमिका आम्ही घेत नाही. आम्ही वक्फ बोर्डाबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. सर्व सामान्य माणसाच्या हिताची भूमिका आम्ही घेतलेली आहे. काही मुठभर लोकांच्या हातामध्ये वक्फ बोर्डाची मालमत्ता ठेवण्यापेक्षा त्या समाजातल्या बहुसंख्य याची सुविधा मिळाली पाहिजे, शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय झाली पाहिजेत. जे वक्फ बोर्डाचं बिल आहे, ते मुस्लिम लोकांच्या देखील फायद्याचं आहे. याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Waqf Bill : विधेयकाबाबत ठाकरे गटाच्या भूमिकेवर श्रीकांत शिंदेंची टीका; आज बाळासाहेब असते तर…

एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

ठाकरे गटावर निशाणा साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, वक्फ विधेयकाबाबत पळकुटी भूमिका कशाला घ्यायची? स्पष्ट भूमिका घ्या ना? जेव्हा गोष्टी फायद्याच्या असतात तेव्हा तुम्ही धरता आणि तोट्याच्या असतील तेव्हा सोडता. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी 100 जागा लढल्या आणि 20 जिंकल्या होत्या. त्यामुळे इथून पुढे होणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता बघायचे आहे की, ते बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका घेऊन पुढे जातात की, राहुल गांधी सांगतील तसे करणार, अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.

हेही वाचा – LOC : पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन; भारताने दोन जवानांना ठार केले



Source link

Comments are closed.