Eknath Shinde expresses anger over Abu Azmi’s glorification of Aurangzeb


गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून त्यांचा अपमान करण्यात येत आहे. अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून त्यांचा अपमान करण्यात येत आहे. अशातच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून टीका होताना दिसत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. (मराठी expresses anger over Abu Azmi’s glorification of Aurangzeb)

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना 40 दिवस हालहाल करून ठार केले. औरंगजेब हा क्रूरकर्मा आहे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल होताना पाहिले तर अंगावर काटा उभा राहतो. त्या चित्रपटात औरंगजेबाचे क्रौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य दाखवण्यात आलं आहे. या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला आणि आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. परंतु देश आणि धर्म सोडला नाही. देशाभिमान आणि राष्ट्रभिमान सोडला नाही, अशा छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून ठार केलं. त्याचं उदात्तीकरण करणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. या गोष्टीचं निषेध जेवढं करू तेवढं कमी आहे, असे म्हणत शिंदे यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Aaditya Thackeray : कोश्यारींची परंपरा सुपारी घेणारे पाळतायेत; महाराजांच्या अपमानप्रकरणी ठाकरे आक्रमक

अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करायला पाहिजे. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपले प्राण अर्पण केले आहे. अबू आझमी यांच्याकडून औरंगजेब चांगला प्रशासक होता, असे कौतुक करणे महापाप आहे. त्यामुळे अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे. ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्याविरोधात बोलणं देशद्रोह आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

काय म्हणाले होते अबू आझमी?

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो 24 टक्के होता. त्यामुळे भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का? असा प्रश्न अबू आझमी उपस्थित केला. त्यांनी असेही म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही. याचपार्श्वभूमीवर अबू आझमी यांना विचारण्यात आले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांसोबत जे केले ते योग्य होता का? या प्रश्नावर मात्र अबू आझमी यांनी उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा – Supriya Sule on Swargate Case : अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना भरचौकात फाशी द्या, सुळेंची मागणी



Source link

Comments are closed.