शिंदे गटाच्या बैठकीत मंत्र्यांसमोरच तुफान ‘राडा’, गचांड्या धरल्या, शिवीगाळ केली

नाशिक येथे सोमवारी शिंदे गटाच्या बैठकीत अहिल्यानगरच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मंत्र्यांसमोरच तुफान ‘राडा’ झाला. एकमेकांच्या गचांड्या धरण्यापासून शिव्यांच्या लाखोल्या वाहण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. गैरसमजातून हा प्रकार झाला असून, याचा शिंदे गटावर परिणाम होणार नाही, अशी सारवासारव मंत्री उदय सामंत यांनी केली.
नाशिकच्या महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सोमवारी शिंदे गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मंत्री दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, राहुल शेवाळे, भाऊ चौधरी उपस्थित होते. अकोले येथील मेळावा हाणून पाडण्याचा प्रयत्न काही पदाधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला, असे प्रकार जिह्यात अन्य ठिकाणीही होत असल्याचे आरोप झाले. यावरून दोन गट एकमेकांना भिडले, शाब्दिक चकमक सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेले, शिव्यांची लाखोली वाहिली गेली. यानंतर मंत्र्यांच्या सूचनेने दोन्ही गटांना बाहेर काढण्यात आले. बाहेर पार्पिंगमध्ये आल्यानंतर पुन्हा दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांचे समर्थक एकमेकांना भिडले, गचांड्या धरून हाणामारी झाली.
दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ता आल्याचा बनाव
या बैठकीत अहिल्यानगर जिह्यातील दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ता येऊन बसला होता, असे स्पष्टीकरण राडा करणाऱ्या एका गटाच्या म्होरक्याने दिले. मात्र, पूर्वपरवानगीशिवाय पिंवा संमतीशिवाय असा कार्यकर्ता येणे शक्य नाही. हाणामारीचा झालेला प्रकार दडपण्यासाठी हा बनाव केल्याची चर्चा सुरू होती.
अहवाल पाठविणार
एकमेकांवरील गैरसमजातून किरकोळ वाद झाला आहे. संघटनेवर त्याचा परिणाम होणार नाही. मंत्र्यांनी दोन्हीही गटाचे ऐपून घेतले होते. आतमध्ये काय झाले हे प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याची गरज नाही. पक्षात राहून पुरघोडी करायची आणि वेगळी भूमिका घ्यायची असा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भातील अहवाल एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगून राडा झाल्याला दुजोराच देऊन टाकला. दुसऱ्या पक्षातील कोणी आलं असेल तर आम्ही भिंग लावून शोधून काढू, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
Comments are closed.