उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; वडनगरहून अहमदाबादला रस्ते मार्गे रवाना – TMarathiNews
गुजरात: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजरात दौऱ्यात त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडनगरहून अहमदाबादला जाण्यासाठी शिंदे यांना रस्ते मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील वडनगर येथे आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’च्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य मान्यवरांसोबत शिंदे यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. वडनगर येथून वाराणसीकडे जाणाऱ्या सेवा संकल्प बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या कार्यक्रमानंतर अहमदाबादकडे जाण्यासाठी शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचा नियोजित प्रवास होता. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने उड्डाणाऐवजी रस्ते मार्गाने अहमदाबादकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, शिंदे यांनी वडनगर येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
Comments are closed.