Eknath Shinde interference in the meeting called by CM Devendra Fadnavis has sparked controversy
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला पुन्हा दांडी मारल्याने महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या महायुतीचा विधानसभा निवडणुकीत बहुमताने विजय झाला. या निवडणुकीत 132 जागा जिंकत भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? यावरून नाराजीनाट्य पाहायला मिळाले होते. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी केली होती. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते. दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांनीही देवेंद्र फडणवीस यांची साथ दिल्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी दरे येथे गेले होते. त्यानंतर पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असतानाही ते दरे गावी गेले होते. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला दांडी मारल्याने महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (मराठी interference in the meeting called by CM Devendra Fadnavis has sparked controversy)
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असायचे. परंतु, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यमुळे नाराज असलेले एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत वारंवार दिसून येत नाहीत. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला उपस्थित राहताना दिसत आहेत. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते. त्यानंतर आज काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. पण एकनाथ शिंदे यांनी बैठकीला दांडी मारली. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा – Marathi Language : मराठी बोला अन्यथा शिस्तभंगाची कारवाई, नियोजन विभागाचे शासन परिपत्रक जारी
एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण काय?
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे बैठकीला अनुपस्थित राहण्याचं कारण सांगितलं आहे. त्यांनी म्हटले की,
शिवसेनेच्या इतिहासामध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पण एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे ते नाराज असू शकत नाहीत. ते शिवसैनिकांना ताकद देणाऱ्या जनतेच्या विकासासाठी झटणारे आहेत. त्यामुळे वैयक्तिक कारणामुळे ते उपलब्ध राहू शकले नसतील, तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि विरोधकांनी ते करू नये, अशी विनंती उदय सामंत यांनी केली आहे.
हेही वाचा – Jitendra Awhad : कालची मॅच फिक्सच, महाराष्ट्र केसरी वादावर काय म्हणाले आव्हाड?
Comments are closed.