Eknath shinde reply sanjay raut over mahadaji shinde award sharad pawar statement
मुंबई : दिल्लीत 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने मंगळवारी सन्मानित केले. हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाला दलाल म्हणत शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
महादजी शिंदे यांचा अपमान केला आहे. त्यासोबत दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील साहित्यकांना दलाल म्हणून अपमानित केले आहे. शरद पवार यांचाही अपमान केला आहे. विधानसभेत चारीमुंड्या चित केले आहे. तरीही सुधारत नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा सुफडासाफ होईल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा : शिंदेंचा सत्कार अन् राऊतांची पवारांवर आगपाखड, आता रोहित पवारांनी भाजपला ओढले वादात; म्हणाले…
संजय राऊत काय म्हणाले होते?
“दिल्लीत सुरू असलेले साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरू आहे. कुणालाही कसेही पुरस्कार दिले जातात, कसेही सत्कार केले जातात. यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करण्यासाठी आलेला आहात का? कोण करतेय, हे संमेलन आयोजित? हा भाजपचा एक उपद्व्याप आहे. मराठीची काय सेवा करत आहात? मी साहित्य संमेलनाला अजिबात जाणार नाही. मराठी स्वाभिमानी माणूस साहित्य संमेलनाला जाणार नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अतिशय दुर्दैवी व्यक्तव्य आहे. महादजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते. अटक ते कटकपर्यंत, दिल्लीच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा फकवला होता. महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाच पुरस्कार मला दिला, हे माझे भाग्य आहे. विरोधकांना पोटशूळ, पोटदुखी उठली आहे. द्वेषाने पछाडलेले आहेत. महादजी शिंदे यांचा अपमान केला आहे. त्यासोबत दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील साहित्यकांना दलाल म्हणून अपमानित केले आहे. शरद पवार यांचाही अपमान केला आहे. राजकारणापलीकडे नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे शरद पवार यांनी दाखवून दिले.”
“मी देखील अडीच वर्षे मुख्यमंत्री, 10 वर्षे मंत्री आणि 40 वर्षांच्या सामाजिक कारकिर्दीत कधीही राजकारणाच्या कक्षेत बांधून घेतले नाही. राजकारणापलीकडे मैत्री आणि संबंध जपल्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकलो. जे आरोप करत आहेत, दोष देत आहोत, लोकांचा अपमान करत आहोत, त्या सगळ्यांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल. विधानसभेत चारीमुंड्या चित केले आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि भावांनी विरोधकांचे पानीपत केले. विरोधी पक्षनेते एवढी संख्याही दिली नाही. तरीही सुधारत नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा सुफडासाफ होईल,” असा एकनाथ शिंदे यांनी ठणकावले आहे.
हेही वाचा : शरद पवारांचे शिंदेबद्दल ‘ते’ विधान अन् राऊत भडकले; म्हणाले, ‘हे खोटेय…’
Comments are closed.