Eknath Shinde will help the family of Syed Adil Hussain Shah, who died in the Pahalgam terrorist attack


सय्यद आदिल हुसैन शाहच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले आहे.

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या 20 वर्षांच्या स्थानिक युवकाचा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यचानंतर आज (25 एप्रिल) शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद्द संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सय्यदच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच सय्यद आदिलच्या कुटुंबाचे मोडकळीस आलेले घर नव्याने बांधून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले आहे. (मराठी will help the family of Syed Adil Hussain Shah, who died in the Pahalgam terrorist attack)

दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे 23 एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे दाखल झाले होते. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव शिंदे यांना सांगितला. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद आदिलच्या कुटुबियांना तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : उद्धव ठाकरेंच्या त्या भूमिकेवर फडणवीस नाराज; शरद पवारांवरही साधला निशाणा

त्यानुसार आज सय्यद आदिलच्या कुटुंबियांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशाप्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या याचा अनुभव त्याने सांगितला.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack : होय, गेली 30 वर्षं आमचे दहशतवादाला खतपाणी, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली



Source link

Comments are closed.