Ratnagiri News – वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत आंबेड खुर्द येथील वृद्धाचा मृत्यू
मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ने धडक दिल्याने एका ६२ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. शांताराम तानु येल्ये असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज रविवारी सकाळी १० च्या सुमारास आंबेड-भंडारवाडी येथील सुरंग बोगद्याजवळ घडली. शांताराम येल्ये हे रेल्वे रूळ ओलांडत असताना किंवा रुळाच्या कडेने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची त्यांना जोराची धडक बसली असा अंदाज आहे या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच प्रभारी आंबेड खुर्दचे पोलीस पाटील सुरेश राहटे यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस स्थानकात खबर दिली. घटनेची नोंद केली .या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आर. एस. गावीत करत आहेत.
Comments are closed.