उमेदवार, इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी! प्रचार संपल्यानंतर निवडणूकविषयक…
महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या जाहीर प्रचाराची मुदत 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता संपणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वरे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आज आयुक्त दिनेश वाघमारे, आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी मतदान होणार आहे. पालिका निवडणूक अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या 48 तास आधी म्हणजे 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे प्रचाराच्या समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्भवत नसल्याचे निवडणूक आयुक्त वाघामार यांनी स्पष्ट केले.
उमेदवाराचे नाव संबंधित पालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक
महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक उमेदवाराचे नाव संबंधित महापालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. सूचक आणि अनुमोदकाचे नाव उमेदवार निवडणूक लढवत असलेल्याच प्रभागात असणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवारास आणि अपक्ष उमेदवारासही प्रत्येकी एक सूचक आणि एका अनुमोदकाची आवश्यकता असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.
एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात उमेदवारी अर्ज भरून शकतो. परंतु एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येते आणि एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.