राज्यात SIR प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ, ८ ऑगस्टपर्यंत चालणार मोहीम
राज्यातील एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. मतदार यादी पडताळणीसाठी आता १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे प्रशासनाला आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एबीपी माझाने यासंदभात वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी जाऊन केली जाणारी मतदार याद्यांची पडताळणी मोहीम आता ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. याआधी ही संपूर्ण प्रक्रिया २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र आता पडताळणीसाठी अतिरिक्त १० दिवसांचा कालावधी मिळाल्याने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता येणार असून अचूक मतदार यादी तयार करण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, पडताळणी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यामुळे मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. जी मसुदा यादी आधी ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक असावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून ही विशेष खबरदारी घेतली जात आहे.
Comments are closed.