बिहारमध्ये वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास नकार, निवडणूक आयोग कुणासाठी लपवत आहे माहिती? – रोहित पवार

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदार यादीची विशेष फेर तपासणी (SIR 2025) सुरु आहे. या प्रक्रियेत सुमारे 65 लाख मतदारांचे नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, असा दावा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे. यातच ही माहिती निवडणूक आयोग कुणासाठी आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत हा प्रश्न विचारला आहे.
X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले की, “स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने कुणाच्या मनाप्रमाणे नाही तर पाठीचा कणा असल्याप्रमाणे निष्पक्ष राहणं अपेक्षित आहे. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला. तरीही आयोग मात्र धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याचा आव आणत आहे आणि उलट राहुल गांधी यांच्याकडून शपथपत्राची मागणी करतोय. हे म्हणजे, ‘गिरे तो भी टांग उपर’, असला प्रकार आहे. आता तर वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास बांधिल नसल्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात देऊन निवडणूक आयोग नेमकं काय लपवत आहे? आणि कुणासाठी लपवत आहे?”
Comments are closed.