मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर, तब्बल 11 लाख दुबार मतदार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र या यादीत अनेक घोळ असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने समोर आणलं आहे. यासाठी शिवसेना, मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाकडे तक्रार ही दाखल केली आहे. नवीन प्रारुप मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदारांची वार्डप्रमाणे आकडेवारी समोर आली आहे. यातच 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याची माहिती समोर आली आहे. या यादीत 11,01,505 दुबार मतदारांची नावे आहेत. यातच एस. वार्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे. एस. वार्डमध्ये 69500 दुबार आहेत. तर बी वार्डमध्ये सर्वात कमी दुबार मतदारांची आकडेवारी समोर आली आहे. बी वार्डमध्ये 8,398 दुबार मतदार आहेत.

दरम्यान, सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळासह राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. तसेच मतदार यादीत घोळ दुरुस्त करण्याची मागणी केली.

Comments are closed.