पुढील महिन्यात दोन दिवसांची परिषद आयोग आयोग
ज्ञानेश कुमार यांच्या पदग्रहणानंतरचे पहिले पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात दोन दिवसीय संमेलनाचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी केली आहे. या संमेलनात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी सामील होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या संमेलनात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
हे संमेलन 4-5 मार्च रोजी नवी दिल्लीच्या इंडियाइंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये आयोजित होणार असल्याचे आयोगाकडुन सांगण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर हे पहिले संमेलन असणार आहे. याचा उद्देश निवडणूक प्रक्रिया, नवे तंत्रज्ञान आणि निवडणूक संचालनात सुधारणांवर चर्चा करणे असणार आहे. चालू वर्षात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्या दृष्टीने तयारीकरता देखील या संमेलनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.