उमेदवारांच्या खर्चाचा ताळेबंद तपासताना येणार नाकीनऊ!

निवडणूक म्हटलं की उमेदवारांकडून जेवणावळी आल्याच. उमेदवाराला निवडणूक खर्चाची एकूण मर्यादा नऊ लाख रुपये आहे. 289 प्रकारचे खर्च दाखवायचे झाल्यास ताळेबंद पाहणाऱ्याला ‘नाकीनऊ’ येतात. एक उमेदवार निवडणुकीत किती लोकांना जेवण देतो आणि किती थाळ्या दाखवतो हा निवडणूक आयोगासाठी संशोधनाचा विषय आहे. मांसाहारी थाळीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेली दरसूची स्वस्तात मस्त आहे.

सध्या सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जेवण आणि चहा, नाष्टय़ासाठीची दरसूची परवडेल अशीच आहे. टपरीवरील चहा, कॉफी आणि ढाब्यावरील थाळीचे दर आयोगाने गृहीत धरले आहेत. शाकाहारी थाळीसाठी 70, स्पेशल थाळी 120, मांसाहारी थाळीमध्ये अंडाकरी 120, चिकन 150, मटण 200, मच्छी 200 ही दरसूची आहे. साधा चहा सात, तर स्पेशल चहा 15 रुपये आहे. कॉफीचा दर तितकाच आहे. शिरा, पोहे, उपीट 15 रुपये, मिसळ 40 रुपये, पाणी बॉटल 20 रुपये, 200 मिली शीतपेये 20 रुपये आहे.

Comments are closed.