पालिका निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महापालिकांसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरीच आहे. मिंधे सरकारच्या 2022 मधील अध्यादेशामुळे निवडणुका रखडल्या आहेत. त्या अध्यादेशाला आव्हान देणाऱया याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील बुधवारची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली. पुढील सुनावणी 28 जानेवारीला होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.