हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप
केले: अकोल्यातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वैशाली कहाकर यांनी हळदी कुंकाच्या कार्यक्रमात पैसे वाटल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. आज उमेदवार वैशाली कहाकर यांनी आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला 300 च्या जवळपास महिला जमल्या होत्या. या सर्व महिलांना उमेदवार वैशाली कहाकर यांनी ब्लाउज पीस, तिळाचे लाडू आणि सोबत 500 रुपये दिल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला आहे.
हळदी कुंकवाच्या ठिकाणी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ
या हळदी कुंकवाच्या ठिकाणी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. या गोंधळानंतर घटनास्थळावर जुने शहर पोलीस दाखल झाले आहेत. या ठिकाणी पैसे वाटपाचा आरोप शिंदे सेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रांनी केला आहे. तर उमेदवार वैशाली कहाकर यांनी पैसे वाटपाचा आरोप फेटाळला आहे. दरम्यान, या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाला 300 च्या जवळपास महिला जमल्या होत्या. या सर्व महिलांना उमेदवार वैशाली कहाकर यांनी ब्लाउज पीस, तिळाचे लाडू आणि सोबत 500 रुपये दिल्याचा आरोप केला आहे.
इचलकरंजीत पैसे वाटप केल्याच्या कारणावरुन वाद चिघळला, शिव शाहू विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवारांकडून पैसे वाटप करत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीच इचलकरंजी शहरातील विविध भागांमध्ये पैसे वाटपाच्या तक्रारी वाढल्या असून, त्यातूनच प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वाद झाल्याचं समोर आल आहे. भाजपने शिव शाहू विकास आघाडीच्या उमेदवार पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यावर दोन्ही गट आमने सामने आल्याचा पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, तसा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात चारचाकी गाडीत आढळले पैसे
अमरावतीच्या महादेव खोरी परिसरात चारचाकी गाडीत पैसे आढळल्याची घटना घडली आहे. निवडणुकीत मतदारांना देण्यासाठी पैसे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती मिळत आहे. सध्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये गाडीसह पैसे आणले आहेत. पोलिसांनी निवडणूक विभागाकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. नेमके पैसे कशासाठी आणले या बाबद पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
नांदेडमधील हुकूमशाही मोडून काढा, राष्ट्रवादीला मत द्या, प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना टोला
आणखी वाचा
Comments are closed.