दिल्लीत मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा भगवा फडकला, आप अन् काँग्रेसला मोठा धक्का?

दिल्ली निवडणुकीचा निकाल 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) सध्या ट्रेंडनुसार मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या भाजप 43, आप (AAP) 27 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस (Congress) एकाही जागेवर आघाडीवर नाही. तर दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका दिसून येत आहे.

दिल्लीत 13 टक्के मुस्लीम मतदार असून पाच जागांवर याआधी मुस्लीम आमदार निवडून आले आहेत. यंदा दिल्लीतील मुस्लिम बहुल जागांवर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले आहे. मुस्तफाबाद, बल्लीमारन, सीलमपूर, मतिया महल, चांदणी चौक आणि ओखला या मुस्लीम बहुल जागांवर काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

मुस्लीम बहुल मतदारसंघात भाजपचाच बोलबाला

दिल्लीतील सीलमपूर, मुस्तफाबाद, मटिया महल, बल्लीमारन आणि ओखला या जागांवर भाजप वगळता सर्व पक्षांचे मुस्लीम उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मुस्तफाबाद मतदारसंघातून भाजपचे मोहन सिंग बिष्ट,  आम आदमी पक्षाचे आदिल खान, काँग्रेसचे अली मेहंदी, एआयएमआयएमचे ताहिर हुसेन यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघातून भाजपचे मोहन सिंग बिष्ट आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर बल्लीमारन विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून कमल बंगाडी, काँग्रेसकडून हारून युसूफ, आम आदमी पक्षाकडून इम्रान हुसेन यांच्यात सामना रंगला असून येथेही भाजप उमेदवार आघाडीवर आहे.

तसेच ओखला विधानसभा मतदारसंघात  काँग्रेसकडून अरिबा खान,  भाजपकडून मनीष चौधरी, आम आदमी पक्षाकडून अमानतुल्ला खान, एआयएमआयएमकडून शिफा उर रहमान यांच्यात लढत होत असून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर आहेत. सीलमपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनिल गौर, काँग्रेसकडून अब्दुल रहमान आणि आम आदमी पक्षाकडून झुबेर अहमद यांच्यात लढत होत असून भाजपचे अनिल शर्मा सीलमपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत.  मतिया महल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून दीप्ती इंदोरा, आपकडून आले मोहम्मद इक्बाल, काँग्रेसकडून असीम मोहम्मद खान रिंगणात असून भाजपच्या उमेदवार आघाडीवर आहेत. आता या मुस्लीम बहुल विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election Result 2025 : दिल्लीत आप अन् काँग्रेस पिछाडीवर, संजय राऊतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, दोघे एकत्र लढले असते तर..

Delhi Election Result 2025 : आपापसात आणखी लढा, एकमेकांना संपवा, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचा ‘आप’ अन् काँग्रेसवर हल्लाबोल

अधिक पाहा..

Comments are closed.