दिल्ली विधानसभेत कोण बाजी मारणार, भाजप केजरीवालांच्या गडाला सुरुंग लावणार?

Delhi Assembly Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि कल हाती येण्यास सुरुवात होईल. दिल्लीत तब्बल 13 वर्षांपासून आम आदमी पक्षाची (AAP) एकहाती सत्ता आहे. यंदा अँटी इन्कबन्सी फॅक्टरच्या जोडीला भाजपने लावलेली प्रचंड ताकद ‘आप’ची (AAP) सत्ता उलथवून लावेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी (Exit Polls 2025) व्यक्त केला आहे. तसे घडल्यास हा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का ठरु शकतो. त्यामुळे आज दिल्लीत काय निकाल लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांवर कोण बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्कंठा आहे. यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि ‘आप’वरील विश्वास डळमळीत होतो का, हे आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होईल.

 

Comments are closed.