इकडं थलपती विजय तमिळ राजकारण रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा कुठं जाऊन पोहोचली?

त्रिशा कृष्णन: ‘क्वीन ऑफ साऊथ इंडिया’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन आज 43 वर्षांची झाली. तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली त्रिशा, सध्या साऊथ सुपरस्टार थलपथी विजयसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिओ’ या सुपरहिट चित्रपटासह, या दोघांनी मिळून पाच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. थलपथी विजयने अलीकडेच घटस्फोटाची घोषणा केली आणि त्रिशासोबत सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली, ज्यामुळे त्यांच्या अफेअरबद्दलच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. विजयच्या माजी पत्नीनेही त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे.

विजय बाजीगर ठरला

विशेष म्हणजे तमिळनाडू विधानसभेचा निकाल लागला असून विजय बाजीगर ठरला आहे. जवळपास 107 जागांवर आघाडी घेत तमिळ राजकारणात झंझावाती प्रवेश केला आहे. विजयच्या कुटुबीयांनी विजयच्या यशाचा आनंद साजरा केला असतानाच त्रिशा आज थेट बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. त्यामुळे त्रिशाच्या वाढदिनीच्या विजयने बंपर गिफ्ट दिल्याची चर्चा तमिळनाडू राजकारणात रंगली आहे. बालाजी मंदिरात दर्शनानंतर दुपारी त्रिशा विजयच्या घरी पोहोचली. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी तिला गराडा घातला होता.

विजय आणि त्रिशा 2021 पासून नात्यात

थलपथी विजयने 25 ऑगस्ट 1999 रोजी चाहती संगीता सोरनालिंगमशी लग्न केले, त्याला दोन मुले आहेत. लग्नाच्या 27 वर्षांनंतर, संगीताने अलीकडेच विजयपासून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. वृत्तानुसार, संगीताने घटस्फोटासाठी विजयच्या विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख केला आहे.

याचिकेत संगीताने आरोप केला आहे की, थलपथी विजयचे 2021 पासून त्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. विजयने आश्वासन दिले होते की तो त्या अभिनेत्रीसोबतचे संबंध संपवेल, परंतु वारंवार संधी देऊनही त्याने केले नाही. तो त्या अभिनेत्रीसोबत ट्रिपला जात राहिला आणि त्यांचे फोटो सतत समोर येत राहिले. या फोटोंमुळे तिला अपमानित झाल्यासारखे वाटले. इतकेच नाही तर, विजयने तिची जबाबदारी घेणेही जवळजवळ सोडून दिले होते, ज्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

हाय-प्रोफाईल लग्नाला उपस्थित राहिला

थलपथी विजयच्या पत्नीने याचिकेत त्या अभिनेत्रीचा उल्लेख केला नाही, परंतु त्याचे नाव बऱ्याच काळापासून त्रिशा कृष्णनसोबत जोडले जात आहे. नात्याच्या अफवांदरम्यान, ते दोघे 2023 च्या ‘लिओ’ चित्रपटात एकत्र दिसले होते. थलपथी विजयच्या घटस्फोटानंतर लगेचच, तो त्रिशा कृष्णनसोबत एका हाय-प्रोफाईल लग्नाला उपस्थित राहिला होता. ही त्यांची एकत्र पहिली सार्वजनिक उपस्थिती होती. अनेकांना वाटले की घटस्फोटानंतर त्या दोघांनी आपले नाते अधिकृत केले आहे. दरम्यान, विजयच्या अंगरक्षकाने एक पोस्ट शेअर केली, ज्यात लिहिले होते, “अफवांवर पडदा टाकण्याची वेळ आली आहे.”

बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण..

दुसरीकडे, त्रिशा कृष्णनने ‘मिस चेन्नई’ जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, ती फाल्गुनी पाठकच्या सुपरहिट म्युझिक अल्बममधील ‘मेरी चूनर उड उड जाये’ या गाण्यात दिसली. याच गाण्यातून आयेशा टाकियानेही पदार्पण केले होते. काही वर्षांनंतर, त्रिशाने अक्षय कुमारच्या ‘खट्टा मीठा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट ठरला, पण त्यानंतर तिला कोणतेही चित्रपट मिळाले नाहीत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.