एलन मस्क यांचे 13,74,13,60,35,000 रुपये बुडाले
![elon musk](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/1739417079_70_elon-musk-696x447.jpg)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांना जोरदार झटका बसला आहे. टेस्लाचे शेअर्स घसरल्याने मस्क यांचे एका दिवसात तब्बल 15.9 अब्ज डॉलर्स म्हणजेच 13,74,13,60,35,000 रुपये बुडाले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार, आता मस्क यांची एकूण संपत्ती कमी होऊन 379 अब्ज डॉलर राहिली आहे. मस्क यांनी दोन दिवसापूर्वीच चॅटजीपीटीची पॅरेंट कंपनी ओपनएआयला खरेदी करण्याची ऑफर दिली होती. परंतु, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी ही ऑफर नाकारली होती. उलट, मस्क यांचे एक्स सोशल मीडिया हँडल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता.
जगातील 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 6 व्यक्तींच्या संपत्तीत घसरण झाली आहे. यामध्ये जेफ बेजोस, लॅरी एलिसन, लॅरी पेज, सर्गेई ब्रिन आणि स्टिव्ह बाल्मर यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे. तर मार्क झुकरबर्ग, बर्नार्ड आरनॉल्ट, बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या संपत्ती वाढ झालीय. श्रीमंत व्यक्तीच्या यादीत झुकरबर्ग (253 अब्ज), बेजोस (252 अब्ज), एलिसन (199 अब्ज), आरनॉल्ट (189 अब्ज), पेज (166 अब्ज), बिल गेट्स (166 अब्ज), ब्रिन (156 अब्ज), वॉरने बफे (148 अब्ज), बालमर (144 अब्ज) यांचा समावेश आहे.
Comments are closed.