एलॉन मस्क यांची स्टारलिंक इंटरनेट सेवा बांगलादेशात सुरू

एलॉन मस्क यांची सॅटेलाईट इंटरनेट कंपनी स्टारलिंकची इंटरनेट सेवा हिंदुस्थानात सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे, परंतु हिंदुस्थानआधीच स्टारलिंकने आपली सेवा बांगलादेशात सुरू केली आहे. स्टारलिंकच्या दाव्यानुसार इंटरनेट स्पीड 300 एमबीपीएसपर्यंत मिळणार आहे. स्टारलिंकने बांगलादेशात दोन प्लान लाँच केले आहेत. पहिला प्लान 6000 टका म्हणजेच 4200 रुपये प्रति महिना, तर दुसरा प्लान 4200 टका म्हणजेच 2900 रुपये प्रति महिना आहे. तसेच या प्लानची इन्स्टॉलेशन फी 32,900 रुपये आहे.
Comments are closed.