एलन मस्क यांचे 1 लाख कोटी स्वाहा; अदानी आणि अंबानींची संपत्तीही घटली

जगातील सर्वात श्रीमंत अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची संपत्ती तब्बल 1 लाख कोटींनी घटल्याचे समोर आले आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीतही लक्षणीय घट झाली असून टॉप 10 उद्योजकांच्या यादीत केवळ बर्नाट अर्नाट यांच्या संपत्तीतच वाढ दिसून आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत एलन मस्क यांच्या संपत्तीत 11.9 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 1 लाख कोटींहून अधिक घट झाली आहे. मस्क यांची संपत्ती 385 अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. यंदाच्या वर्षात त्यांना 47 अब्ज डॉलरचे नुकसान झाले.

जगातील क्रमांक 2 चे श्रीमंत उद्योजक व फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 3.87 अब्ज डॉलर म्हणजेच 33,533 कोटी रुपयांहून अधिक घसरण झाली असून त्यांची संपत्ती 241 अब्ज डॉलर झाली आहे, तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीत 5.81 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 50,343 कोटी रुपयांहून अधिक घट झाली असून त्यांची संपत्ती 237 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

अदानींना 12217 कोटींहून अधिक नुकसान

गौतम अदानी यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना एकूण 1.41 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 12217 कोटी रुपयांहून अधिक नुकसान सहन करावे लागले असून त्यांची एकूण संपत्ती 65.4 अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. या आकडय़ांसह ते संपत्ती घसरलेल्या उद्योजकांच्या यादीत 23 व्या क्रमांकावर आहेत. दरम्यान 2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत अदानींना 12.3 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

जिंदाल आणि शिव नादर यांनाही मोठा फटका

जेएसडब्ल्यू ग्रुपच्या सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 3.9 अब्ज डॉलरची घट झाली असून त्यांची संपत्ती 28.4 अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. शापूर मिस्त्राr यांच्या संपत्तीत 2.73 अब्ज डॉलरची घट झाली असून त्यांची संपत्ती 35.9  अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर दिलीप सांघवी यांच्या संपत्तीत 3.81 अब्ज डॉलरची घसरण होऊन त्यांची संपत्ती 25.7 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

अंबानी 17 व्या क्रमांकावर मुकेश अंबानी यांना तब्बल 415 दशलक्ष डॉलर म्हणजेच 3595 कोटी रुपयांहून अधिक नुकसान सहन करावे लागले आहे? त्यांची एकूण संपत्ती 87.3 अब्ज डॉलर इतकी झाली आहे? या आकडय़ांसह संपत्तीच्या घसरणीत मुकेश अंबानी 17 व्या क्रमांकावर आहेत?

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक विपत्र गेट्स यांच्या संपत्तीत 1 अब्ज डॉलरची घसरण झाली असून अनुभवी गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या संपत्तीत एकूण 873 थांबवा डॉलरची घसरण झाल्याचे दिसत आहे?

लॅरी एलिसन यांना 8.03 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 69,492 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असून त्यांची एकूण संपत्ती 192 अब्ज डॉलर इतकी झाली आहे?

Comments are closed.