शाळेत बॉम्बची धमकी

प्रातिनिधिक फोटो

जोगेश्वरी परिसरातील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा शाळेला ई-मेल आला. त्या धमकीच्या ई-मेलमुळे काही वेळासाठी खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक व नाशकच्या पथकाने तपासणी केल्यावर ती अफवा असल्याचे समोर आले.  जोगेश्वरी परिसरात एक खासगी शाळेला एका गँगच्या नावाने ई-मेल आला. शाळेत बॉम्ब ठेवल्याचे त्या ई-मेलमध्ये नमूद केले होते. हा ई-मेल कोणी पाठवला याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.