शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णाला उलटी पुसायला लावली, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुजोर कर्मचाऱ्यांचा प्रताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णाच्या पिळवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शस्त्रक्रिया झालेल्या एका महिला रुग्णाला वॉर्डमध्ये उलटी झाली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी ती उलटी त्याच महिला रूग्णाकडून साफ करून घेतली.

संगीता मनोहर पवार या महिलेवर काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी महिलांच्या वार्डामध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री संगीता पवार यांना उलटी झाली त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी संगीता पवार हिलाच ती उलटी साफ करायला सांगितले. संगीता पवार यांचे पती मनोहर पवार यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे हाऊसकिपिॅगचा स्टाफ नाही म्हणून रुग्णांकडूनच साफसफाई करून घेतो असे सांगितले.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी जातात मात्र त्यांची अशी पिळवणूक होत आहे.जिल्हा रुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असून रूग्णांची हेळसांड होत आहे.

सफाई कामगारांचे काम काय?

जिल्हा शासकीय रुग्णालयातील सफाई कामगार नेमण्यात आले आहेत. जर साफसफाई ही रुग्णांकडून करून घेतली जात असेल तर सफाई कामगारांचे काम काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामचुकार कामगारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.