इराणने मानले हिंदुस्थानी जनतेचे आभार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानातील इराणी दूतावासाने हिंदुस्थानी जनतेचे आभार मानले आहेत. ‘युद्धादरम्यान आर्थिक मदत करणाऱया हिंदुस्थानी नागरिकांचे मनापासून आभार’ अशा शब्दात दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हे आभार मानले आहेत. हिंदुस्थानी नागरिकांकडून मोठ्या पाठिंब्यासोबत आर्थिक मदत पाठवली जात होती. परंतु लोकांनी यापुढे कोणत्याही खात्यावर पैसे पाठवू नयेत, असे आवाहन केले आहे. याआधी 22 मार्चला इराणने हिंदुस्थानी नागरिकांकडून देण्यात आलेले पैसे आणि दागिन्यांबद्दल आभार मानले होते. हिंदुस्थानच्या नागरिकांनी दिलेले प्रेम आम्ही कायम लक्षात ठेवू, असे इराणने म्हटले आहे.

Comments are closed.