IND vs ENG: रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर, पुनरागमनावर पंत काय म्हणाला?
रिषभ पंत (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना खेळणार नाही. त्याच्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून त्यामुळे तो या सामन्याबाहेर झाला आहे. पंतने आपल्या ‘एक्स’ अकाउंट वरून एक खास नोट शेअर करत स्वतःची तब्येतीसंबंधी माहिती दिली. यामध्ये त्याने चाहत्यांना सांगितलं की तो कधी आणि कशा पद्धतीने क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार रिषभ पंतने आपल्या एक्स अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याच्या पायावर प्लास्टर असल्याचं दिसत आहे. त्याच्या शेजारी चालण्यासाठी काठी ठेवलेली दिसत आहे, ज्याच्या मदतीने तो चालू शकतो. या फोटोसोबत पंतने एक भावनिक नोट देखील लिहिली आहे.
पंत म्हणाला, माझ्यावर जो प्रेम आणि आशीर्वाद बरसतो आहे, तोच माझ्या बळाचा खरा स्रोत आहे. त्याने पुढे लिहिलं, मी लवकरच परत येणार आहे, एकदा माझं फ्रॅक्चर बरे झालं की. मी हळूहळू या प्रक्रियेतून जात आहे. मी सध्या विश्रांती घेत आहे, रुटीन फॉलो करत आहे आणि माझं 100% देत आहे.
पुढे तो म्हणाला, देशासाठी खेळणं हेच माझ्या जीवनातील सगळ्यात अभिमानाचा क्षण आहे आणि मला पुन्हा त्या गोष्टीत परतायला खूपच आतुरता वाटत आहे,कारण तीच गोष्ट मला सर्वात जास्त प्रिय आहे.
रिषभ पंतला ही दुखापत चौथ्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावादरम्यान झाली. जेव्हा तो फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा क्रिस वोक्सच्या चेंडूवर स्वीप शॉट मारताना चेंडू त्याच्या पायाच्या अंगठ्यावर बसला. त्यामुळे त्याला तीव्र वेदना जाणवली आणि त्याला 37 धावांवर ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदानाबाहेर जावं लागलं.
पण जेव्हा पंतने पाहिलं की टीम इंडियाला (Team india) त्याची गरज आहे, तेव्हा त्याने वेदना असूनही पुन्हा मैदानात उतरून फलंदाजी सुरू ठेवली. अशा परिस्थितीतसुद्धा त्याने छक्के मारणं थांबवलं नाही आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीमुळे भारताच्या पहिल्या डावाचा स्कोअर 350 पार गेला. त्याच्या या धाडसी खेळीचं सर्व क्रिकेट दिग्गजांनी कौतुक केलं.
Comments are closed.