गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, चार नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली जिल्ह्यातील नारायणपूर सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी मारले गेले. ही चकमक सुमारे आठ तास चालली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कोपरशी जंगल परिसरात छापा टाकला होता, जिथे गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० आणि इतर नक्षलवादी लपले होते. आधी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला, ज्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. ज्यात चार नक्षलवादी ठार झाले.

या चकमकीत मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला होत्या. चकमकीत नंतर शोध मोहिमेदरम्यान पोलिसांना एक एसएलआर रायफल, दोन इनास रायफल्स आणि 1 .303 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. उर्वरित नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.