IPL 2026: धोनीशिवाय कशी आहे CSK ची कामगिरी? तब्बल 277 सामन्यांचा इतिहास काय सांगतो
आयपीएल (IPL 2026) स्पर्धेच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) एका ऐतिहासिक युगाचा अंत होताना दिसत आहे. तब्बल 277 सामन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे की, चेन्नईचा संघ आपले दोन मुख्य आधारस्तंभ महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni & Suresh Raina) आणि सुरेश रैना यांच्याशिवाय मैदानात उतरला आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या पहिल्याच सामन्यात धोनीच्या अनुपस्थितीमुळे संघाचे संपूर्ण समीकरण बदलले आहे. धोनी हा केवळ एक खेळाडू नसून तो संघाची ओळख आहे. त्याची अनुपस्थिती संघासाठी एक मोठे मानसिक आव्हान आहे. धोनीचे फिटनेस आणि खेळाप्रती असलेले समर्पण इतके जबरदस्त होते की, त्याने अनेक वर्षांपासून एकही सामना चुकवला नव्हता. धोनी शेवटचा 2019 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध चेपॉक स्टेडियमवर खेळला नव्हता, त्यानंतर तो सतत संघाचा भाग राहिला आहे. मात्र, 2026 च्या हंगामामध्ये दुखापतीमुळे धोनीला पुढील 6-7 सामन्यांतून बाहेर पडावे लागले आहे.
आकडेवारीनुसार, धोनीशिवाय चेन्नईची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. गेल्या अशा चारही सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2010- दिल्ली डेअरडेविल्स दिल्ली विजय
2010- किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईचा पराभव केला
2010- आरसीबी बेंगळुरू पराभव
2019- सनरायझर्स हैदराबाद हैदराबाद पराभव
2019- मुंबई इंडियन्स चेन्नई पराभव
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी स्पष्ट केले आहे की, धोनीच्या अनुपस्थितीत केरळचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. सॅमसनला नुकतेच राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड डीलद्वारे चेन्नईत घेण्यात आले आहे. फ्रँचायझी त्याच्याकडे ‘भविष्यातील धोनी’ म्हणून पाहत आहे. विश्वनाथन म्हणाले की, संजू सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून तो नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे, त्यामुळे तो धोनीची कमतरता काही प्रमाणात भरून काढेल अशी संघाला आशा आहे.
Comments are closed.