Energy Drink Ban in Maharashtra ahilyanagar Pedgaon Gram Panchayat in marathi
अहिल्यानगर : अनकेदा शीतपेय तसेच एनर्जी ड्रिंक हे शरीरासाठी किती हानिकारक आहेत? हे वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला सांगितले गेले आहे. पण महाराष्ट्रातील एका गावाने तर या एनर्जी ड्रिंक्स आणि शितपेयांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात या गावाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये असलेल्या पेडगाव ग्रामपंचायतीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयानंतर आता राज्यातील अनेक गावांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. (Energy Drink Ban in Maharashtra ahilyanagar Pedgaon Gram Panchayat)
हेही वाचा : Satara : परफ्यूममुळे गिर्यारोहकांवर ओढवले संकट, मधमाशांच्या हल्ल्यात 6 गंभीर जखमी
अनेकदा ग्रामपंचायतींकडून गावकऱ्यांच्या हिताचे वेगवेगळे ठराव केलेले आपण बघितले आहेत. या माध्यमातून गावामध्ये बदल घडवण्याचे काम केले जाते. असाच काहीसा निर्णय पेडगाव ग्रामपंचायतीनेदेखील घेतला आहे. गावात असलेल्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावामध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला गेला. त्यानंतर त्याची अंमलबजावणीही ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता गावामध्ये कोणतेही शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विकण्यावर संपूर्ण गावात बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, पेडगावमध्ये 8 हजार लोकसंख्या आहे. या गावामध्ये 3 शाळा असून यामध्ये अंदाजे एक हजार आहेत. गावात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने गावामधील व्यावसायिक शीत पेय आणि एनर्जी ड्रिंक्ससुद्धा विकतात.
का घेतला निर्णय?
काही दिवसांपूर्वी गावामध्ये एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांकडून शीतपेय आणि एनर्जी ड्रिंकच्या विक्रीला विरोध करण्यात आला होता. यानंतर गावचे सरपंच आणि सदस्यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत महिलांची विशेष ग्रामसभा बोलावली होती. यावेळी ग्रामसभेत पेडगाव येथे कोणत्याही व्यावसायिकाला एनर्जी ड्रिंक आणि शीतपेय विक्री करता येणार नाही अशा प्रकारचा ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले. सर्वांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला.
Comments are closed.