बुमराहचा पंजा अन् राहुलचा थाट, शेवटच्या सेशनमध्ये टीम इंडियाची जबरदस्त पलटवार! लीड्स कसोटी रोमा
India vs England 1st Test Day 3 Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला लीड्स कसोटी सामना रोमांचक मोडवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाला फक्त 6 धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 2 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, टीमची आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. केएल राहुल 47 धावा काढून नाबाद आहे, तर कर्णधार शुभमन गिलही 6 धावा काढून खेळत आहे. खराब प्रकाशामुळे खेळ सुमारे 25 मिनिटे आधी संपवावा लागला.
आणखी वाचा
Comments are closed.