पाकिस्तानी क्रिकेटपटूचे करिअर अडचणीत! वकिलाची गरज भासेल

पाकिस्तानचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून पहिले दोन सामने जिंकत इंग्लंडने विजयी आघाडी घेतली आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीची आणि बोर्डच्या वागणुकीची अधिक चर्चा होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटचा स्तर इतका खाली घसरेल, याची भूतकाळात कोणी कल्पनाही केली नसेल. सध्या त्यांचे खेळाडू आणि बोर्ड एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे एका खेळाडूची कारकिर्दच अडचणीत आली असून त्याला स्वत:चा बचाव करण्यासाठी वकिल नेमला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतीचे नाटक केल्याचा आरोप इमाम उल हकवर आहे. त्याबाबत अधिक चौकशीचे आदेश पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (PCB) दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इमाम उल हकने स्वत:चा बचाव करण्यासाठी वकिल नेमला आहे.
झाले असे की, इमामला पहिल्या कसोटी सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्यानंतर PCB ने एक निवेदन जाहीर केले होते. त्यात सांगितले गेले की, इमामला क्षेत्ररक्षण करताना पोटरीची दुखापत झाली असून त्याला फिटनेस मिळवण्यासाठी 10 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
त्यानंतर इमाम पायाला पट्टी बांधून सराव करताना दिसला. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायर झाला होता. यानंतर स्टुअर्ट ब्रॉडसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट पंडितांनी तो दुखापतीचे नाटक करत असल्याचा दावा केला होता.
पीटीआयच्या वृत्तानुसार, इमाम गंभीर अडचणीत आला असून त्याला स्वत:चा बचाव करण्यासाठी वकिल नेमावा लागू शकतो.
इमाम मोठ्या अडचणीत आहे. जेव्हा तो मंडळाच्या चौकशी समितीसमोर हजर होईल तेव्हा त्याला वकिलाची गरज भासेल. ही समिती त्याच्या दुखापतीची चौकशी करेल. याच दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये फलंदाजी करू शकला नव्हता.
प्रकरण आधीच गंभीर असताना पाकिस्तानच्या माजी निवडकर्त्याने त्यात आणखी भर टाकली आहे. मोहम्मद वसीम यांनी खुलासा केली की, 2022 च्या इंग्लंड मालिकेदरम्यान इमामच्या दुखापतीमध्ये फिजिओथेरेपिस्ट क्लिफ डीकन यांना एक विशिष्ट नमुना दिसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली होती. यामुळे फलंदाजाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
इमामच्या दुखापतीबाबत 2025 मध्ये एका मीडिया रिपोर्ट्सनुसार PCB ने स्थापन केलेल्या समितीला काही विचित्र बाब दिसली होती. तेव्हाच्या न्यूझीलंड दौऱ्यात इमामने अंगठ्याला दुखापत झाल्याचे नाटक केले होते. हे प्रकरण इतके वाढले होते की, समितीने इमामवर सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्याचा विचार केला होता.
खेळाडूंना पाठवले घरी
इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मोठा पराभव झाल्याने पाकिस्तानने सात खेळाडूंना मायदेशी पाठवले आहे. तसेच त्यांनी सरफराज खान आणि उमर गुल या दोन प्रशिक्षकांनाही पदावरून काढले आहे.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा आणि शेवटचा सामना 9 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.
Comments are closed.