IND vs ENG; भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा…! 'या' स्टार खेळाडूचे पुनरागमन
आगामी भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यादरम्यान आता इंग्लंडने आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू ‘जोस बटलर’च्या (Jos Buttler) नेतृत्वाखाली इंग्लंड संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) दुखापतीनंतर संघात पुनरागमन करण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. बटलरशिवाय ‘जो रूट’चाही (Joe Root) इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत दौऱ्यासाठी इंग्लंडचा टी20 संघ- जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड
5 सामन्यांच्या टी20 मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी20 सामना- 22 जानेवारी, ईडन गार्डन्स
दुसरा टी20 सामना- 25 जानेवारी, एम ए चिदंबरम स्टेडियम
तिसरा टी20 सामना- 28 जानेवारी, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
चौथा टी20 सामना- 31 जानेवारी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
पाचवा टी20 सामना 2 फेब्रुवारी, वानखेडे स्टेडियम
ब्रेकिंग स्क्वॉड न्यूज! 🚨
भारत दौऱ्यावर आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमचे पथक! 📝
तपशीलासाठी खाली क्लिक करा 👇
– इंग्लंड क्रिकेट (@englandcricket) 22 डिसेंबर 2024
महत्त्वाच्या बातम्या-
Year Ender 2024; मराठी पाऊल पडते पुढे! स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला दुसरे पदक मिळवून दिले
IND VS AUS; विराट कोहली एमसीजी मध्ये सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणार?
रोहित-विराटपासून, सुनिल छेत्री-राफेल नदाल पर्यंत, या वर्षात अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती
Comments are closed.