इंग्लंड फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा पहिला युरोपीय देश

इंग्लंडने पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक 2026 साठी पात्र ठरत इतिहास रचला आहे. लॅटवियाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने 5-0 असा दणदणीत विजय मिळवत युरोपमधील पहिले पात्र ठरणारे राष्ट्र बनले. कर्णधार हॅरी केनने पहिल्याच हाफमध्ये दोन गोल ठोकत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या विजयासह इंग्लंडने आपल्या गटात अव्वल स्थान निश्चित केले असून आता तो सलग आठव्यांदा विश्वचषकात सहभागी होणार आहे.
Comments are closed.