हायप्रोफाईल पबमध्ये दोन महिलांना पेयातून गुपचूप ड्रग्ज देऊन अत्याचार; माजी क्रिकेटपटूच्या कृत्य

इंग्लंड क्रिकेट बातम्या: क्रिकेटच्या जगतातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका माजी क्रिकेटपटूवर दोन महिलांना नशा करून (Drug Spiking) त्यापैकी एकीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा गंभीर आरोप लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

लंडनमधील पबमध्ये घटना

ही घटना लंडनच्या चेल्सी भागातील ‘द बाउंड्री’ (The Boundary) या पबमध्ये घडली. या पबमध्ये इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम, जोस बटलर, इऑन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्स यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू भागीदार आहेत. आरोपानुसार, 22 मे रोजी दोन महिलांना ड्रग्ज दिले गेले आणि त्यापैकी एका महिलेला लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले.

पोलिसांचा तपास सुरू – अजून अटक नाही

लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ‘द डेली टेलिग्राफ’ला दिलेल्या निवेदनात या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि तपास सुरू आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड वरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) वरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना या घटनेची माहिती आधीपासून होती, तरीदेखील त्यांनी यावर मौन बाळगले. इंग्लंड क्रिकेटमध्ये याआधीही अशा प्रकारच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. काही वर्षांपूर्वी एका माजी काउंटी प्रशिक्षकाला आणि एका प्रोफेशनल प्रशिक्षकाला अशाच आरोपांनंतर निलंबित करण्यात आले होते. एकूणच, हे प्रकरण इंग्लंड क्रिकेटसाठी लज्जास्पद आहे. यामुळे खेळाडूंच्या वर्तनाबरोबरच संस्थात्मक जबाबदारीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता या माजी क्रिकेटपटूविरुद्ध पुढे कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ड्रग्ज स्पाइकिंग म्हणजे काय? (What is drug spiking?)

ड्रग्ज  स्पाइकिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पाणी, दारू किंवा ज्यूसमध्ये नकळत नशा आणणारी किंवा मानसिक परिणाम करणारी औषधे मिसळणे. यामागचा हेतू बहुतांश वेळा त्या व्यक्तीला बेशुद्ध करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणे, त्याला वश करून घेणे किंवा त्याची संमती न घेता अत्याचार करणे, असा असतो.

हे ही वाचा –

Ind vs Pak Playing XI Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध सूर्या आपला हुकमी एक्का बाहेर काढणार; वरुण चक्रवर्तीचा पत्ता कट? जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग-11

आणखी वाचा

Comments are closed.