हैरी ब्रूकवर IPL बंदी योग्यच? इंग्लंडच्या खेळाडूंची मोठी प्रतिक्रिया!
मागच्या काही दिवसात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने आयपीएल स्पर्धेतून त्याचं नाव काढून घेण्याचा निर्णय घेतला. हैरी ब्रूकच्या या निर्णयाचा दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला. पण यानंतर बीसीसीआयने हैरी ब्रूकच्या या निर्णयावर सक्त निर्णय घेतला आहे. बीसीसीआईने हैरी ब्रूकला 2 वर्षांकरिता आयपीएल मधून बॅन केले आहे. आत्ता आयपीएलचे पुढचे दोन हंगाम हैरी ब्रूक खेळू शकणार नाही. त्यानंतर आता इंग्लंडच्या मोईन अली आणि आदिल रशीद यांनी हैरी ब्रूकला बॅन केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही खेळाडूंनी बॅन केल्याचा निर्णय योग्य आहे असे म्हटले आहे.
मोईन अलीने हैरी ब्रूकच्या बॅन वर म्हटले की, हा कठोर निर्णय नाही. मी ह्या निर्णयाशी सहमत आहे. कारण मोठ्या संख्येमध्ये खेळाडू असे करतात. या आधीही खूप खेळाडूंनी असे केले आहे. ते परत माघारी येतात आणि मोठ्या संख्येने पगार घेतात. तो म्हणाला माझं म्हणणं आहे की, एखाद्या खेळाडूने संघातून नाव काढून घेतल्यास संघातील काही गोष्टी बिघडतात. कोणताही संघ जर हैरी ब्रूक सारख्या खेळाडूला संघात खेळू शकत नसेल तर संघात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू म्हणाला की, जर कोणती परिवारासंबंधीत अडचण असल्यास किंवा दुखापत झाली असेल तर ठीक आहे, पण जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे स्पर्धेतून माघार घेत असाल तर तुम्हाला बॅनचा सामना करावा लागेल.
त्यानंतर इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद म्हणाला, हा नियम स्पर्धा सुरू होण्याआधीच बनवण्यात आला आहे. आणि आता जे झालं आहे, तर तुम्हाला माहित आहे की, नियम काय आहेत. हा गोलंदाज म्हणाला, जेव्हा तुम्ही तुमचं नाव लिलावासाठी पाठवता, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की, नाव माघारी घेतल्यावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. तुम्हाला या परिणामांची पूर्ण कल्पना असते. यामुळे मला वाटत नाही की हा खूप कठोर निर्णय आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने हैरी ब्रूकला त्यांच्या संघात सामील केले होते. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच ब्रूकने त्याचं नाव स्पर्धेमधून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments are closed.